• दीनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नागरी पथ विक्रेता यांचे सर्वेक्षण करून विक्री साठी जागा उपलब्ध करून देणे व वित्तीय संस्थाकडून पत मिळविण्यास मदत करणे, कौशल्य प्रशिक्षण, सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे, इत्यादी साठी प्रयत्नशील आहे. नागरी पथ विक्रेत्यांना सहाय्य या उपांगासाठी दी.अ.यो.रा.ना.उ. अभियाना ने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना व व्युहरचना आखली आहे.

  •     उद्देश :-

  • नागरी पथ विक्रेत्यांना सहाय्य या उपांगाचा मुख्य उद्देश पथ विक्रेत्यांची गरीबी निर्मुलन करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्या करिता खालीलप्रमाणे उपाययोजना आखल्या आहेत.

  • १. नागरी पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण करून ओळख पत्र व प्रमाणपत्र देणे.

  • २. शहर पथ विक्री आराखडा तयार करणे.

  • ३. शहरामध्ये विभाग निहाय पायाभूत सुविधा तयार करणे.

  • ४. प्रशिक्षण व कौशल्यवाढ करणे

  • ५. वित्तीय समावेशन

  • ६. पत मिळवून देणे.

  • ७. सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ

नावनोंदणी
मंजूर
प्रलंबित
नाकारलेले